माणसाची ओळख जातीवरून नव्हे तर कर्तुत्वावरून होते ; सरपंच उमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चपळगाव येथे विविध कार्यक्रम
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.१७ : समाजात माणसाची ओळख ही जातीवरून होत नसते तर ती कर्तुत्वावरून होत असते. कर्तुत्वाने उंची गाठलेला माणूस हा नेहमी श्रेष्ठ असतो. आज वाढदिवसाच्या निमित्ताने केलेला माझा सत्कार हा मला नक्की बळ देईल. गावकऱ्यांच्या सेवेसाठी यापुढेही मी सदैव तत्पर राहीन, असा विश्वास मनीषा ऍग्रोचे प्रमुख तथा चपळगावचे सरपंच उमेश पाटील यांनी व्यक्त केला. सोमवारी,अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे सरपंच पाटील यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत चपळगाव ग्रामस्थ व वंचित बहुजन आघाडीच्यावतीने त्यांचा केक कापून नागरी सत्कार करण्यात आला. त्यानंतर विविध संस्था व मान्यवरांनी पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार केला.
सत्काराला उत्तर देताना पाटील पुढे म्हणाले की, माणूस कुठल्या जातीत जन्माला येतो हे महत्त्वाचे नाही तर तो काय करतो हे महत्त्वाचे आहे आणि त्याच्या कर्तुत्वाने माणसाची ओळख होत असते म्हणून त्याला समाज ओळखत असतो तसेच ज्यांच्यावर चांगले संस्कार आणि चांगले विचार रुजलेले असतात तो माणूस चुकीच्या मार्गाने कधीही जात नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो कोणासोबत राहतो आणि कोणाबरोबर फिरतो यावरही त्याची प्रगती अवलंबून असते, असेही ते म्हणाले. सत्काराबद्दल त्यांनी चपळगाववासियांचे आभार मानले.
यावेळी बोलताना युवा नेते बसवराज बाणेगाव यांनी उमेश पाटील हे चपळगाव लाभलेले उत्तुंग नेतृत्व आहे. त्यांच्या प्रयत्नातून गावचा कायापालट होत आहे. त्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गावात आज जवळपास १ कोटीची विकास कामे चालू आहेत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी तंटामुक्त अध्यक्ष महेश पाटील, सिद्धाराम भंडारकवठे, इस्माईल जमादार, प्रा.परमेश्वर आरबळे, विस्तार अधिकारी प्रशांत अरबळे, जितेंद्र जाजू, गंगाधर कांबळे, नितीन शिवशरण, सिद्धाराम डोळळे आदींनी त्यांच्या विषयीच्या कामांना उजाळा देत त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला.
यावेळी जेष्ठ नेते के.बी.पाटील, मनोज इंगोले, महादेव वाले, ज्ञानेश्वर कदम, सुरेश सुरवसे, श्रावण गजधाने, महिबूब तांबोळी, परमेश्वर वाले, मल्लिनाथ सोनार, संगमेश्वर भंगे, माणिक गायकवाड, विश्वजीत कांबळे, मोहन दुलंगे, वामनराव मोतीवाले, विकास नारायणकर, पंडित मिस्त्री, संदीप गजधाने, अनिकेत गजधाने, भागवत गजधाने आदींसह जय भवानी तरुण मंडळ, बंजारा जय सेवालाल तरुण मंडळ, महात्मा बसवेश्वर तरुण मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर जगताप यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर कदम यांनी मानले.
निराधारांची दिवाळी झाली गोड !
पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या चपळगाव शाखेने निराधारांना धान्यवाटप करून दिवाळी गोड केली. ५१ लोकांना दिवाळीचे २ हजाराचे किट, ५१ विधवा निराधार महिलांना मान्यवरांच्या हस्ते साड्या वाटप करण्यात आले. या उपक्रमाने ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले.