---Advertisement---

सरपंच उमेश पाटील यांचा लोकनेते एस. बी प्रतिष्ठानतर्फे सत्कार

Follow Us:
---Advertisement---

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट, दि.१७ : चपळगाव (ता.अक्कलकोट ) येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल वाढदिवसानिमित्त सरपंच उमेश पाटील यांचा चपळगाव येथील लोकनेते एस.बी प्रतिष्ठान व बाणेगाव परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सरपंच पाटील यांनी १९९७ पासून मागच्या पंचवीस वर्षात जी उद्योग क्षेत्रात गगनभरारी घेतली आहे. ती खरोखरच कौतुकास्पद
आहे त्यांच्या माध्यमातून आज दोनशे ते तीनशे लोकांना रोजगार मिळाला आहे. हे विसरून चालणार नाही. ते निश्वार्थी आहेत आणि त्यांच्याकडे विकासाचा दृष्टीकोन आहे. आज त्यांच्यामुळे चपळगावचे नाव उज्वल झाले आहे, असे एस.बी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बसवराज बाणेगाव यांनी सांगितले.

यावेळी यावेळी तंटामुक्त अध्यक्ष महेश पाटील, सिद्धाराम भंडारकवठे, मनोज इंगोले, ज्ञानेश्वर कदम, महादेव वाले, सुरेश सुरवसे आदींसह प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!