अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
सोलापुरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.बसवराज सुतार यांच्या ‘हृदयस्पंदन’ या नव्या क्लिनिकचे उद्घाटन रविवारी सकाळी १० वाजता फौजदार चावडी समोरील श्री जय भवानी मेडिकल शेजारी पार्क चौक सोलापूर येथे खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते आणि डॉ.आशिष नाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या समारंभास शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे, आमदार सचिन कल्याणशेट्टी,माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे,स्वामी समर्थ कारखान्याचे अध्यक्ष संजीवकुमार पाटील,उपाध्यक्ष विश्वनाथ भरमशेट्टी,उद्योजक प्रमोद मोरे, माजी नगरसेवक चेतन नरोटे,विनोद भोसले, डॉ.उमाश्री सुतार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
डॉ.सुतार हे मूळचे अक्कलकोट तालुक्यातील हन्नुरचे असून ते एमडी मेडिसिन आणि डीएनबी कार्डियलॉजिस्ट आहेत.त्यांनी हैदराबाद येथे इलेकट्रो फिजियोलॉजिस्टमध्ये फेलोशिप देखील मिळविली आहे.गेल्या अनेक वर्षापासून ते सोलापुरात चांगली वैद्यकीय सेवा देत आहेत.सध्याही अनेक हॉस्पिटलमध्ये ते कार्डियालॉजिस्ट आणि इलेक्ट्रो फिजियोलॉजीस्ट म्हणून कार्यरत आहेत. आता त्यांच्या स्वतःच्या या नूतन हार्ट केअर उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.या समारंभास सर्वांनी उपस्थित राहावे,असे आवाहन डॉ.बसवराज सुतार यांनी केले आहे.