ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हजारोंचा जनसमुदायात आ.प्रणिती शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल

सोलापूर : प्रतिनिधी

देशभरात लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली असून राज्यात देखील अर्ज भरण्याचे सुरु झाले आहे. त्यामुळे भाजपसह विरोधी पक्षातील सर्वच नेत्यांनी शुभ मुहूर्त बघून अर्ज भरलेले असून आज सोलापुरात काँग्रेस भवन येथून मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणाऱ्या सभेनंतर काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी आमदार उत्तम प्रकाश खंदारे, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक धर्मराज काडादी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बळीराम काका साठे आदी मान्यवर उपस्थित होते. 42-सोलापूर (अ. जा.) लोकसभा मतदारसंघासाठी कु. प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

आज गुरुवारी सकाळी काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडीचे नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचंड घोषणाबाजी नंतर जाहीर सभा घेण्यात आली .त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅली निघाली. त्यामध्ये हजारोंच्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!