---Advertisement---

आ.प्रणिती शिंदेंनी काढली भाजपची लाज ; वडील खांद्याला खांदा लावून !

By team
On: April 18, 2024 4:19 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

भाजपवर हल्लाबोल करताना मी लढाईला चालले माझी एकट्याची लढाई नाही तुमच्या सर्वांची लढाई आहे त्यामुळे मला तुमची साथ गरजेची आहे. आपणाला सोलापूरचा चेहरा बदलायचा आहे. त्यासाठी सोबत राहा, भारतीय जनता पार्टीचे दोन्ही खासदार निष्क्रिय ठरले, यावेळी प्रचारांमध्ये या दोन्ही खासदाराला घेऊन फिरायला भाजपला लाज वाटते का? असा प्रश्न उपस्थित करत माझे वडील पहा खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत राहतात या शब्दात प्रणिती शिंदे यांनी भाजपवर तोफ डागली.

आज गुरुवारी काँग्रेस महाविकास आघाडीच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपला भव्य शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी काँग्रेस भवना समोर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार प्रणिती शिंदे यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!