ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आ.सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थिती हिंदू मुस्लिम बांधावासाठी ‘ दावत ए इफ्तार’ !

अक्कलकोट : प्रतिनिधी

भाजपा अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष नन्नूभाई कोरबू मित्रपरिवार तर्फे पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून सर्व हिंदू मुस्लिम बांधावासाठी ‘ दावत ए इफ्तार’चे आयोजन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थित हिंदू मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावत इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न झाला.

यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, अक्कलकोट तालुका हा सर्वधर्म समभावाचे प्रतीक असून हिंदू-मुस्लिम समाजाची एकता अक्कलकोट येथे आज सुद्धा टिकून असल्याने रमजान, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, दीपावली, विविध गावाच्या जत्रा यासह विविध सण हिंदू मुस्लिम बांधव एकत्र साजरी करीत असल्याचे सांगून सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. इफ्तार पार्टी आयोजित केल्याबद्दल नन्नूभाई कोरबू मित्रपरिवाराचे कौतुक केले.

याप्रसंगी आणि छत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, राष्ट्रवादीचे दिलीपभाऊ सिद्धे, श्री वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, माजी उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, रिपाई तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय देशमुख, आलम कोरबू, पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, पोलीस निरीक्षक महेश स्वामी, एपीआय निलेश बागाव, लाला राठोड, नागराज कुंभार, मैंदर्गी चे युवा नेते महेश सावरी, हुसेनसाहेब मुजावर, नावेद डांगे,चंद्रकांत मडीखांबे, मोहसीन बागवान, रजाक सय्यद, भैया नाईकवाडी, शकील नाईकवाडी, रशिद खिस्तके, सलीम शेख, वाहिद नाईकवाडी, गौस शेख नागराज कुंभार शबाब शेख,आसिफ नाईकवाडी,हनीफ कोरबू मारुती बावडे, स्वामीराव गायकवाड,बुडन तांबोळी, सोहेल बागवान,बबलू जमादार,आसिफ नाईकवाडी,सैपन पठाण,हुसेन बळोरगी, मुबीन पटेल गौस पटेल नूर शेख अजय मुकणार निखिल पाटील शुभम मडीखांबे भीमा मलवे श्रीकांत मलवे मोहसीन शेख अझहर शेख अफसर पठाण अश्फाक शेख सुभान नाईकवाडी दाऊद नाईकवाडी इस्माईल मणियार अल्ताफ कोरबू जावेद नाईकवाडी गोटू माने आलम इनामदार नूर नाईकवाडी कदीर नाईकवाडी सोनू इनामदार सोनू खिलाडी अरबाज खान सुभान नाईक जोयेफ कोरबु रईस शेख सैपन शेख असलम कोरबू सुभान शेख सैपन कोरबू टिल्ल्या सुभान शेख जावेद शेख रमजान नाईक संजय बडवे आसिफ नाईकवाडी तौसीफ नाईकवाडी तनवीर साहिल शेख आयान मणियार सुतार मुस्लीम बांधव उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या लोकांचं आभार रशिद खिस्तके यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!