---Advertisement---

अक्कलकोटच्या कमलाराजे चौकातील आयलँड अखेर सुरू

By team
On: March 24, 2025 2:46 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेले कमलाराजे चौकातील आयलँड अखेर सुरू झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.मुख्याधिकारी रमाकांत डाके आल्यापासून शहरात अनेक गोष्टी नव्याने पाहायला मिळत आहेत.त्यांचा वृक्ष लागवडीचा ही प्रयोग यशस्वी ठरला आहे.त्यानंतर आता आयलँड सुरू करण्याच्या उपक्रमाचे शहरवासीयांनी स्वागत केले आहे.

अक्कलकोट शहरातील महत्वाच्या चौकातील दोन्ही आयलँड सुरु करून शहराचे सौंदर्य वाढवावे अशी मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती.त्यावर संबंधित अधिकारी यांनी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यानुसार सुरुवातीस कमलाराजे चौकातील आयलँडचे हौद दुरुस्त करून लिकेज काढणे,किरकोळ बांधकाम करणे, त्याची संपूर्ण स्वच्छता करून रंगरंगोटी करणे, कारंजाची किरकोळ पाईपलाईन दुरुस्ती करणे आदी कामे अग्रक्रमाने केली गेली. त्याला निसर्ग सेवा फौंडेशन आणि काशिरायाकाका पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम अक्कलकोट नगरपरिषद स्वच्छता कर्मचारी व अधिकारी यांचे सहकार्य घेऊन केले गेले.

याचे फलित म्हणून मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिलेला शब्द पाळला आणि सर्व कामे पूर्ण करून दि.२२ मार्च रोजी कारंजा सुरु करण्यात आला. आता यापुढे हे नेहमी सुरु ठेवले जाणार आहे. शेवटच्या टप्यात त्याला रंगीत फोकस बसविले जाणार आहे. यानंतर आता बसस्थानक जवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आयलँड सुरु केले जाणार आहे.हे दोन्ही आयलँड आता सुरु होणार असल्याने येत्या सुट्याच्या काळात वाढत्या भविकांना सुखद अनुभव येऊन शहाराचे सौंदर्य आणखी वाढण्यास आणि परिसरातील वातावरण थंड राहण्यास मदत होणार आहे.यासाठी आरोग्य निरीक्षक नितीन शेंडगे,पाणी पुरवठा विभागाचे मनोजकुमार ईश्वरकट्टी, बांधकाम विभागाचे भांबरे आणि अन्य अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.

 

बस स्थानकाजवळील आयलँड देखील सुरू करणार

मला अक्कलकोटला सेवा करण्याची संधी मिळाली हेच मी भाग्य समजतो आणि या पदाच्या माध्यमातून जितके काही अक्कलकोट साठी करता येईल. ते करण्याचा निश्चितपणे प्रयत्न मी करत आहे.आता बसस्थानक जवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आयलँड सुरु केले जाणार आहे.याला नागरिकांनी देखील तितक्याच ताकदीने पुढे येऊन सहकार्य करावे.

रमाकांत डाके, मुख्याधिकारी

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!