ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सेंद्रिय शेतीवर अक्कलकोटमध्ये उद्या चर्चासत्राचे आयोजन

अक्कलकोट : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ ऑर्गेनिक व रोटरी क्लब अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रीय शेती चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती एका पत्रकान्वये दिली आहे. श्री स्वामी समर्थ ऑर्गेनिक व रोटरी क्लब अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि.१० ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता लोकापुरे मंगल कार्यालय येथे सेंद्रीय शेती चर्चा सत्रचे आयोजन करण्यात आले आहे.

गोकुळ ऑर्गेनिक बेळगावचे चेअरमन हणमंत गौडरु यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी, श्री वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, चपळगावचे सरपंच उमेश पाटील, बळीराजा सेंद्रीय बचत गट टेंभुर्णीचे महेश पाटील, सेंद्रीय शेतीतज्ञ सांगोलाचे संजय दिघे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सेंद्रीय प्रमाणिकरण, तालुक्यात विषमुक्त अन्नधान्य पुरविणे, उत्पादनाचे खर्च कमी करणे, जमिनीचा पोत सुधारणे, सेंद्रीय कर्ब वाढविणे, सेंद्रीय पध्दतीने रोग व किड व्यवस्थापन, सेंद्रीय शेती करणार्‍या शेतकर्‍यांन ह्काचा व्यासपीठ निर्माण करणे, शेतकर्‍यांना हक्काचा बाजारपेठ निर्माण करुन देणे, अक्कलकोट येथे सेंद्रीय मॉल निर्माण करणे, समूह व गटशेतीचे मार्गदर्शन, फॅफिली शेतकरी संकल्पना राबविणे आदी उद्देश या सेंद्रीय शेती चर्चा सत्रातून असणार आहे.

तरी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या चर्चा सत्रचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!