मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली !

By team
On: February 3, 2026 4:29 PM
Follow Us:
---Advertisement---

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

भाजप नेत्या व राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये मंगळवारी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना उघडकीस आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून लातूरकडे उड्डाण घेण्याच्या तयारीत असताना वैमानिकाच्या सतर्कतेमुळे हा बिघाड वेळेत लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली.

सध्या पंकजा मुंडे मराठवाड्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यावर असून आज लातूर जिल्ह्यात त्यांच्या विविध प्रचारसभा नियोजित होत्या. यासाठी त्या छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून हेलिकॉप्टरने लातूरकडे रवाना होणार होत्या. मात्र हेलिकॉप्टर हवेत झेप घेण्यापूर्वीच तांत्रिक अडचण आढळून आल्याने सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ उड्डाण रद्द करण्यात आले.

या घटनेमुळे लातूरमधील त्यांच्या नियोजित सभांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी तातडीने दुसऱ्या हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली असून पंकजा मुंडे लवकरच लातूरकडे रवाना होणार असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. थोडा विलंब झाला असला तरी सर्व नियोजित सभांना त्या उपस्थित राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार मोहीम राबवत पंकजा मुंडे आज (3 फेब्रुवारी) लातूरसह सोलापूर जिल्ह्यातही जाणार आहेत. सोलापुरात मंद्रूप आणि कुंभारी येथे सायंकाळी अनुक्रमे 6 आणि 8 वाजता त्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे, सोमवारी छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात झालेल्या प्रचार सभेत बोलताना पंकजा मुंडे यांनी, “मी हेलिकॉप्टरने प्रवास करत असल्यामुळे माझी आई देव पाण्यात ठेवते,” असे भावनिक विधान केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड आढळून आल्याने या घटनेची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. मात्र पायलटच्या सतर्कतेमुळे कोणतीही दुर्घटना घडली नसल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment