ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रेल्वेच्या बोगीला अचानक लागली आग

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक शहरात छोट्या मोठ्या अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच दि.२ मार्च रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास अचानक बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ सायडिंगला लावण्यात आलेल्या एका एक्सप्रेसच्या बोगीला अचानक आग लागली. बघता-बघता आगीचा भडका उडाला. क्षणार्धात संपूर्ण बोगीच आगीच्या विळख्यात सापडली. आग इतकी भीषण होती, की परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट उठले.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीच्या विळख्यात एक्स्प्रेसच्या दोन ते तीन बोगी जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाचं मोठं नुकसान झालं आहे. आगीचे कारण अद्याप समोर आलेलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ सायडिंगला सदरील एक्स्प्रेस उभी होती. शुक्रवारी रात्री १ वाजेच्या सुमारास या एक्स्प्रेसच्या एका बोगीला अचानक आग लागली. क्षणार्धात आगीचा भडका उडाल्याने संपूर्ण बोगी आगीच्या विळख्यात सापडली.
गाडी साईडिंगला असल्यामुळे त्यात कोणीही प्रवासी नव्हते. आग लागल्याचे कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीचे लोट उठत असल्याने कर्जत येथून मुंबईकडे आणि मुंबईकडून कर्जतकडे जाणारी मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!