ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ट्रॅक्टरच्या धडकेत तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

सोलापूर : प्रतिनिधी

वैरागकडून सोलापूरकडे दुचाकीवरून येत असताना वैराग जवळील डेंगळे-पाटील मेडिकल कॉलेजसमोर रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडकल्याने दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला. त्यास उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वीच तो मयत झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड गांधी नगरातील रहिवासी अक्षय प्रभाकर म्याकल (वय-२४) हा तरुण वैरागकडून सोलापूरकडे येत असताना ही घटना घडली. त्याच्या डोक्यास, हातापायास मार लागून तो जखमी झाला होता. त्यास उपचाराकरता सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. सिव्हील पोलीस चौकीत याची नोंद झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!