दुधनी : अक्कलकोट तालुका शिवसेनाप्रमुख संजय देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थीतीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवास्थानी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, संपर्क प्रमुख शिवाजी सावंत, जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांच्या उपस्थितीत तालुका प्रमुख संजय देशमुख, योगेश पवार, प्रा.सुर्यकांत कडबगावकर, रुग्ण कल्याण समितीचे बसवराज बिराजदार यांच्यासह तीस पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.
गेल्या महिन्यात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटातील अक्कलकोट तालुकाप्रमुख संजय देशमुख व शहरप्रमुख योगेश पवार व अन्य पदाधिका-यानी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे पक्षपदाचा व पक्ष सदसत्वाचा राजीनामा दिला होता. यामुळे अक्कलकोट तालुक्यातील राजकारणात खळबळ उडाली होती. अडीच वर्षापासुन कोणतेच काम न झाल्यामुळे पदाधिकाऱ्यामध्ये नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे आम्ही पक्ष पदाचा राजीनामा देत आहोत, असे तालुका प्रमुख संजय देशमुख आणि अक्कलकोट शहर प्रमुख योगेश पवार यांनी सांगितले होते.
यावेळी खंडू कलाल,चंद्रकांत वेदपाठक,वैशाली हावनूर,वर्षा चव्हाण,ताराबाई कुंभार,उमेश पांढरे,
सैपन पटेल,समीर शेख,विनोद मदने,
महिबूब शेख,राहुल चव्हाण,इंदुमती वाघमारे,नारायणकर राष्ट्रवादीचे सिद्धाराम जाधव यांच्यासह पाच पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचे देशमुख यांनी सांगितले. यापुढे तालुक्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकासासाठी मोठ्या प्रमाणात आपण
प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी त्यांना निवेदन पण दिलेले आहे आणि अक्कलकोटला येण्यासंदर्भात आग्रह केलेला आहे ते लवकरच अक्कलकोटला देखील येणार आहेत,अशी माहितीही देशमुख यांनी दिली.