---Advertisement---

सोलापुरात उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी लावला भाजपला सुरुंग, भाजपचे दक्षिण आघाडी अध्यक्षासह असंख्य कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत केला प्रवेश…

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर: जिल्ह्यातील राजकीय घडामोडीना वेग आला आहे. काल बुधवारी दोन महत्वाच्या घटना घडल्या आहेत. अक्कलकोट तालुक्यातील ठाकरे गटातील कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला राम-राम करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सोलापुरात भाजपला सुरुंग लावला आहे. भाजपचे दक्षिण आघाडी अध्यक्ष संतोष केंगनाळकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. सांगोल्यात आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

भाजप दक्षिण आघाडीचे अध्यक्ष संतोष केंगनाळकर यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करताना आपल्याला आनंद होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. सोलापुरातील भाजपचे दोन्ही आमदार आपल्याला न्याय देत नाहीत, मनमानी कारभार करतात असा आरोप यावेळी त्यांनी केला.

भाजप मधील विद्यमान आमदारांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आपण हातात मशाल घेतली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आपणास न्याय मिळेल अशी अपेक्षा प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!