ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘या’ दिवशी होणार अभिनेत्री राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी ३’ रिलीज !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

अभिनेत्री राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी ३’ या चित्रपटाची मोठी अपडेट समोर आली आहे. २०१४ साली ‘मर्दानी’ चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत राणी पुन्हा एकदा शत्रूंना धडा शिकवताना दिसणार आहे. यश राज फिल्म्सकडून ‘मर्दानी ३’ची रिलीज डेटची जाहिर करण्यात आली आहे.

यशराज फिल्म्सने त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले, ज्यामध्ये राणी मुखर्जीचा दमदार आणि धडाकेबाज अवतारातील शिवानी शिवाजी रॉय दिसत आहे. पोस्टरमध्ये ती हातात पिस्तूल घेऊन दिसत आहे. तिचा लूक अत्यंत प्रभावी आहे.

पुढील वर्षी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘मर्दानी ३’ प्रदर्शित होणार आहे. प्रोडक्शन हाऊसने कॅप्शनमध्ये लिहिले, “मर्दानी ३ ची उलटी गिनती सुरू! होळीच्या सणाला चांगुलपणा दुष्टांशी लढेल, कारण शिवानी शिवाजी रॉय २७ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या पडद्यावर परत येत आहे.”

प्रदीप सरकार यांच्या दिग्दर्शनाखाली ‘मर्दानी’ हा चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘मर्दानी २’ चे दिग्दर्शन गोपी पुथरन यांनी केले होते, जो २०१९ मध्ये प्रदर्शित झाला. या दोन्ही चित्रपटांमध्ये राणी मुखर्जीला एक कठोर आणि धाडसी पोलीस अधिकारी म्हणून प्रेक्षकांनी खूप पसंत केले. ‘मर्दानी ३’ पटकथा लेखन आयुष गुप्ता यांनी केलं आहे. तर दिग्दर्शनाची धुरा अभिराज मीनावाला यांनी पार पाडली. चित्रपटाच्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी केली. दोन ब्लॉकबस्टर हिट दिल्यानंतर आता ‘मर्दानी ३’ बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड रचण्यासाठी सज्ज होणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!