ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दुधनीत काशी जगद्गुरूंचा अड्डपालखी महोत्सव उत्साहात

दुधनी : प्रतिनिधी

देशात धर्माचे सांभाळ करायचे असेल तर खाकी खादी व भगवा प्रदान केलेली व्यक्ती आपले काम निस्वार्थपणे केल्यास धर्माचे रक्षण केले जाईल, असे गौरवउदगार काशी पिठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले. ते अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे बोलत होते. यावेळी मंचावर अक्कलकोट विरक्त मठाचे मठाधिपती बसवलिंगेश्वर महास्वामीजी, नागणसुर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी, मैंदर्गी मठाचे नीलकंठ शिवाचार्य महास्वामीजी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अप्पू परमशेट्टी, माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे, भाजपचे तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, महेश पाटील, रेवणसिद्ध बिज्जरगी, महेश पाटील यांची उपस्थिती होती.

गुरुवारी काशी जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे अड्डपालखी महोत्सव मोठ्या भक्तीभावात आणि मंगलमय वातावरणात, उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी स्टेशन रोडवरील ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर देवस्थान येथे श्री मल्लिकार्जुन देवस्थान संस्थानच्या भक्त मंडळ आणि ग्रामस्थांच्यावतीने महास्वामीजींचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर विविध फुलांनी सजविलेल्या पालखी काशी जगद्गुरु विराजमान झाल्यानंतर पालखी मिरवणुकीला सुरुवात करण्यात आले.

अड्ड पालखी मिरवणुकीत शहरातील सुमारे एक हजार सुहासिनी डोक्यावर कुंभ घेऊन सहभागी झाले होते. श्रीशैल मल्लिकार्जुन महाराज की जय.. सिद्धेश्वर महाराज की जय.. तपो रत्नम् योगीराजेंद्र शिवाचार्य महाराज की जय, शांतलिंगेश्वर महाराज की जय, गुरुशांतलिंगेश्वर महाराज की जय, या जय घोषणेने आसमंत दुमदुमून गेला होता.

स्टेशन रोडवरील सिद्धेश्वर मंदिर ते मल्लिकार्जुन मंदिरपर्यन्त अडपल्लकी मिरवणूक पारंपरिक वाद्य समवेत काढण्यात आले. मल्लिकार्जुन मंदिरात पालखी महोत्सवाची सांगता करण्यात आली. त्यानंतर काशी जगद्गुरूंच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मल्लिकार्जुन मूर्तीस महाआरती करण्यात आले. सकाळी अकाराच्या सुमारास भूमी पूजन संपन्न झाले.

सदर अड्ड पालखी मिरवणुकीत माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, मलकाजप्पा अंदेनी, चंद्रकांत येगदी, शिवानंद हौदे, सिद्धाराम येगदी, शंकर भांजी, बसवराज हौदे, प्रभुलिंग कुंभार, अतुल मेळकुंदे, सुरेश म्हेत्रे, गुरुशांत उप्पीन, अक्कलकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शंकर म्हेत्रे, सुभाष परमशेट्टी, शिवानंद माड्याळ, सोमण्णा ठक्का, रामचंद्रप्पा बिराजदार, चंदप्पा गीण्णी, बसवराज मगी, गोविंदप्पा परमशेट्टी, विश्वनाथ गंगावती, अंबण्णा निंबाळ, आनंद बाहेरमठ, भीममाशंकर मुगळी, लक्ष्मीपुत्र कण्णी, शांतेश धोडमनी, मल्लिनाथ धल्लु, मल्लय्या मठपती यांच्यासह दुधनीतील विविध सामजिक मंडळांचे पदाधिकारी आणि परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!