ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट महिला तालुका अध्यक्षपदी अॅड. फारिया टिनवाला !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ यांच्या अक्कलकोट तालुका महिला अध्यक्षपदी अॅड. फारिया टिनवाला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पुढील तीन वर्षांसाठी अथवा पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार असल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.

दिलेल्या पदाचे स्वरूप मानद असून भारतीय संविधान, भारतीय कायदे तसेच महासंघाची आचारसंहिता यांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. संघटनेच्या माध्यमातून माहिती अधिकार कायद्याबाबत जनजागृती करणे, नागरिकांना कायदेशीर मार्गदर्शन उपलब्ध करून देणे आणि पारदर्शक प्रशासनासाठी प्रयत्न करणे ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.

नियुक्तीपत्र प्रदान करताना राज्याध्यक्ष सुभाष बसवेकर म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांमध्ये व समाजातील विविध घटकांमध्ये माहितीचा अधिकार अधिनियम २००५ याचा व्यापक प्रसार आणि प्रचार व्हावा. शासनाच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविण्यासाठी माहिती अधिकार कायदा हे प्रभावी साधन असून त्याचा योग्य वापर होणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.

अॅड. फारिया टिनवाला यांच्या निवडीमुळे अक्कलकोट तालुक्यात महिला नेतृत्वाला बळ मिळणार असून माहिती अधिकार चळवळीला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. समाजहिताच्या प्रश्नांवर कायदेशीर पातळीवर लढा देत नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्या सक्रियपणे कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!