हिमाचल प्रदेशनंतर आता गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, दोन टप्प्यात होणार मतदान
दिल्ली : निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशनंतर आता गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर केला आहे. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्लीतील आकाशवाणी भवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे.
गुजरातमध्ये दोन टप्प्यांत मतदान होणार असून आठ डिसेंबरला निवडणुकांचा निकाल लागणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी १४ नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. तर १५ नोव्हेंबरला अर्जांची छाननी केली जाणार आहे. याशिवाय १७ नोव्हेंबर हा दिवस अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असणार आहे.
पहिल्या टप्प्यातील मतदान हे १ डिसेंबरला होणार असून दुसऱ्या टप्प्यासाठी ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. तर८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे