दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून उत्तर कोरियाकडून वारंवार क्षेपणास्त्र चाचणी केली जात आहे. मंगळवारी सकाळी ७ वाजून २९ मिनिटांनी देखील एक आंतरखंडिय क्षेपणास्त्र उत्तर कोरियाने डागले. हे क्षेपणास्त्र थेट जपानच्या सागरात कोसळले. यामुळे जपानमध्ये धोक्याचे सायरण वाजू लागले.
उत्तर कोरियाकडून मागील काही दिवसांपासून क्षेपणास्त्र चाचणी ही घेतल्या जात आहेत. मंगवाळवारी सकाळी उत्तर कोरियाने आंतरखंडीय क्षेपणास्त्र चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र जपानवरून गेल्याने एकाच खळबळ उडाली आहे. यामुळे जपान दहशतीत आहे. जपानमध्ये धोक्याचे सायरन वाजू लागल्याने गोंधळ उडाला आहे. काही वेळात जपानमधील रेल्वेसेवा ही बंद करण्यात आली. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास राहण्यास प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
कोरियाने ही क्षेपणास्त्र चाचणी केल्यानंतर जपानने या चाचणीचा निषेध केला आहे. कीशिदा म्हणाले ही एक क्रूर कृती आहे. क्षेपणास्त्र डागल्या नंतर जपान पंतप्रधान कार्यालयाने उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र जपानवरून गेले असल्याचे ट्वीट केले. उत्तर कोरिया आणि जपान यांच्यातील संबध ताणले गेल्याने भविष्यात यावरून दोन्ही देशात आणखी संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.