---Advertisement---

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज होणार फैसला

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : मनी लॉण्ड्रिग प्रकरणी नोव्हेंबर २०२१ मध्ये ईडी द्वारे अटक करण्यात आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला असून त्यांच्या अर्जावरील युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आज ४ ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती एन.जे. जमादार यावर निकाल सुनावणार आहेत.

अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयात अनेक महिने प्रलंबित असल्याने सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला फटकारले होते. त्यानंतर गेल्या आठवडय़ात न्यायमूर्ती एन.जे. जमादार यांच्या समोर देशमुख यांच्या जामीन अर्जावर दोनदिवस मॅरेथॉन सुनावणी घेण्यात आली होती.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!