अक्कलकोट, दि.२१ : अक्कलकोट नगर परिषदेच्यावतीने राबविण्यात येत असलेली अतिक्रमण हटाव मोहीम थांबवून प्रथम खोकेधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देणे बाबत अक्कलकोट शहर खोकेधारक संघर्ष समिती तर्फे भव्य मोर्चा काढून नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.मागील १५ दिवसांपासून अक्कलकोट शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे परंतु अतिक्रमण काढताना संबंधीत खोकेधारकांना पर्यायी जागा नगरपरिषदेच्यावतीने उपलब्ध करून द्यावी या प्रमुख मागणीसाठी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी व आज मुख्याधिकारी यांना मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे लोकांचा रोजगार बंद आहे आत्ता कुठे उद्योग व्यवसाय सुरू होत असताना नगरपरिषदेच्या वतीने कारवाई होत आहे. खोकेधारकांनी बॅंके तर्फे कर्ज काढून व्यवसाय सुरू केला आहे या कारवाईमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना त्यांच्या मुलभूत गरजा ही भागवणे अवघड झाले आहे. त्यामुळे संबंधित खोकेधारकांना प्रथम पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी मगच अतिक्रमण काढावे, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी अविनाश मडिखांंबे अमर शिरसाट, योगेश पवार ,मनोज निकम,नन्नू कोरबू ,अजय मुकणार, वसंत देडे, इरफान दावना, रशिद खिस्तके,प्रथमेश पवार,सलीम यळसंगी,ऋषी लोणारी,बुडन तांबोळी,स्वामीराव मोरे, राजू नवले,हुसेन बरोळगी,शकील नाईकवाडी,मेहबूब मकानदार, गोटू मलवे, भीमा मलवे ,सुनील कुरले, पिंटू मिनगले, दत्ता माडकर, दिनेश रूही, शुभम मडिखांबे, रजाक बागवान, शाम राठोड, सुरेश गायकवाड, निशांत निंबाळकर, बंटी मडिखांबे,सैपन शेख हनीफ, मुबारक कोरबू, शफिक मणीयार ,चंदू कुंभार, वैभव मोरे, सैपन हागलदिवटे ,सुरेश सोनकांबळे,राजू बनसोडे अंबादास बनसोडे आदींसह सर्व खोकेधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.