---Advertisement---

एकाच स्टेडियमचे तिसऱ्यांदा नामकरण; मोटेरा-सरदार पटेल-आता मोदींचे नाव

On: February 24, 2021 3:00 PM
Follow Us:
---Advertisement---

अहमदाबाद: येथे होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधी मैदानाचे नाव बदलण्यात आले आहे. हे स्टेडियमला मोटेरा स्टेडियम म्हणून ओळखले जाते होते. त्यानंतर संपूर्ण परिसराचे नाव सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स कॉम्पलेक्स असे करण्यात आले होते. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील डे-नाइट कसोटी सामन्याआधी या कॉम्पलेक्समधील क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलण्यात आले आहे. या स्टेडियमला आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान असलेल्या अहमदाबाद येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या सरदार पटेल स्टेडियमचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपतींनी या स्टेडियमला मोदींचे नाव देण्यात आल्याची घोषणा केली.

२०१५ साली हे स्टेडियम पूर्णपणे पाडण्यात आले आणि नव्याने त्याची निर्मिती करण्यात आली. या नव्या स्टेडियममध्ये आधुनिक सुविधा निर्माण केल्या. जुन्या मैदानाची प्रेक्षक क्षमता ५३ हजार इतकी होती. आता या मैदानाची क्षमता १ लाख १० हजार इतकी झाली आहे. ६३ एकर परिसरात असलेल्या या मैदानावर ऑलिपिंक साइझचे स्विमिंग पूल आहे. तर चार ड्रेसिंग रूम आहेत. स्टेडियमच्या परिसरात बॉक्सिंग , बॅडमिंटन, टेनिस आणि अन्य कोर्ट आहेत. या परिसरात हॉकी आणि फुटबॉल मैदान देखील आहेत. या मैदानाचे खास वैशिष्ट म्हणजे प्रत्येक ड्रेसिंग रुमला जिम आहे. जे क्रिकेटच्या मैदानावर कधीच पाहायला मिळत नाही. मोटेरा येथील जुने मैदान १९८२ साली बांधण्यात आले होते. आता या नव्या मैदानासाठी ७०० कोटी रुपये खर्च आला. हे मैदान दोन वर्षात बांधून पूर्ण झाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!