ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अजित पवारांच्या गेमचेंजर घोषणा ! 50 मतदारसंघासाठी 50 स्वतंत्र जाहीरनामे

मुंबई वृत्तसंस्था 

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातच अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.  राज्यातील 50 विधानसभा मतदारसंघासाठी 50 जाहीरनामे पक्षाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहेत. अशी कल्पना पक्षाच्या वतीने पहिल्यांदाच अंमलात आणली गेली आहे.

अजित पवार यांच्या एनसीपीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये राज्यासाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. कालही महायुतीच्या वतीने जाहीरनामा प्रतिद्ध करण्यात आला होता. त्या व्यतिरीक्त पक्षाच्या वतीने हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. अजित पवार यांनी बारामतीसाठी आपला स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

 

 मोठ्या घोषणा

लाडकी बहीण  योजना 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्यात येणार

महिला सुरक्षेसाठी पोलिस दलात 25000 महिलांची भरती

धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये देण्याचे आश्वासन

जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करण्यासाठी प्रयत्न

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन

शेतकऱ्यांच्या पिकांच्या एमएसपीमध्ये 20 टक्के वाढ करण्याचे आश्वासन

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात 45000 जोड रस्ते जोडण्याचे आश्वासन

वृद्धापकाळ निवृत्ती वेतन ₹1500 वरून ₹2100 पर्यंत वाढवण्याचे आश्वासन

वीज बिलात 30% कपात करण्याचे आश्वासन

सौरऊर्जेला प्राधान्य देण्याचे आश्वासन

10 लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी 10000 हजार शिष्यवृत्ती देण्याचे आश्वासन

राज्यात 25 लाख रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन

याआधी मंगळवारी कोल्हापुरात महायुतीने 10 आश्वासने देत युतीचा जाहीरनामा जारी केला होता.या प्रचार सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. त्यांच्या वतीने 10 आश्वासने जाहीर करण्यात आली होती.

 

अजित पवारांची आश्वासने?

लाडकी बहीण योजनेची रक्कम 2100 रुपये आणि 25 हजार महिलांना पोलिस दलात भरती करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय शेतकऱ्यांची 15 हजार रुपयांची कर्जमाफी आणि किसान सन्मान योजना, सर्वांना अन्न व निवारा, वृद्ध पेन्शनधारकांना 2100 रुपयांची मदत, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्याचे आश्वासन, 25 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन. राज्यातील युवक, ग्रामीण भाग आदी भागांमध्ये 45 हजार जोड रस्ते जोडण्याचे आश्वासन, अंगणवाडी सेविका व आशा सेविकांना 15 हजार रुपये मानधन देण्याचे आश्वासन, वीज बिल 30 टक्के कमी करण्याचे आश्वासन, व्हिजन महाराष्ट्र 2029 सादर करण्याचे आश्वासन, तसेच 100 दिवसात कामे करण्याचे आश्वासन अजित पवार यांच्या वतीने देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!