लातूर : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या दोन महिन्यापासून लाडकी बहिण योजना सुरु झाली असून या योजनेचा अनेक महिलांना फायदा तर काहीना पैसे न आल्याने अनेक महिलांनी आपापल्या नेत्याजवळ हे दुख मांडले असतांना नुकतेच जनसन्मान यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारबुधवारी लातूरला आले होते. लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा न झालेल्या महिलांनी, लातूर विमानतळावर पवार यांना घेराव घातला.
िजल्ह्यातील हजारो महिला योजनेच्या लाभापासून वंचित असून,आपण ही समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणीमहिलांनी केली. त्यावर अजित दादांनी उपस्थितअधिकाऱ्यांना तातडीने याची दखल घेण्याच्या सूचनादिल्या. महिलांशी चर्चा करुन यावर लागलीच मार्गकाढण्यात येईल, तुमचा अर्ज द्या सर्वांच्या अडचणी दूरकरू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
ज्या मतदार संघात अजित पवार गटाचे आमदारनिवडून आलेले आहेत, त्या मतदार संघांमध्ये‘जनसन्मान यात्रा’ आणि ‘लाडक्या बहिणींसोबतसंवाद’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.बुधवारी (२८ ऑगस्ट) आमदार बाबासाहेब पाटीलयांच्या अहमदपूर मतदार संघात जनसन्मान यात्रापोचली. या यात्रेची सुरूवात नांदेड-लातूरमहामार्गावरील महाळंग्रा पाटी येथे अजित पवार यांच्याउपस्थितीत झाली. यावेळी, मराठा आंदोलकांनी अजितपवार यांना घेराव घालून घोषणाबाजी केली. यावेळी,आंदोलकांचे म्हणने ऐकून घेत त्यांच्याकडून निवेदनस्वीकारले. त्यानंतर ते अहमदपूर शहरातील छत्रपतीशिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.यावेळीही अहमदपूर शहरात मराठा आरक्षणासाठीआंदोलकांनी घोषणाबाजी केली. या कार्यकर्त्यांनापोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.