कोल्हापूर : राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधानांचे सत्र राजकीय मंडळींकडून सुरु आहे. याच दरम्यान हिवाळी अधिवेशनात विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल एक विधान केले होते. त्या विधानावरून सध्या प्रचंड वादंग निर्माण झाले आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी राजे हे धर्मवीर नव्हते, असं विधान केल होत. त्या विधानानंतर राज्यातील अनेक हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्यावर स्वराज्य संघटनेचे प्रमुख माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्या विधानाचा संभाजीराजे छत्रपती यांनी निषेध केला आहे. अजित पवारांनी कोणत्या आधारावर हे वक्तव्य केल्याचे सांगावे असे आव्हान संभाजी राजे छत्रपती यांनी दिले आहेत.
संभाजी राजे छत्रपती म्हणले की, संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, हे विधान अजित पवार यांनी कोणत्या आधारावर केले आहे. त्यासाठी कोणता संदर्भ जोडला, ते अजित पवार यांनी सांगावे. अजित पवार यांचे विधान चुकीचे असून निषेदार्थ आहे. जबाबदार राजकीय नेत्यानी इतिहासाशी संबधित विधाने करताना अभ्यास करावा असा सल्लाही संभाजी राजे छत्रपती यांनी यावेळी दिला.