---Advertisement---

पोलीस भरतीसाठी आजपासून मैदानी चाचणीला सुरुवात

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : पोलीस भरतीसाठी आजपासून मैदानी चाचणीला सुरुवात होत आहे. सरकारने पोलीस भरतीची घोषणा केली आहे तेव्हापासून लाखो तरुण दररोज सकाळी मैदानी चाचणीसाठी सराव करत आहेत. महाराष्ट्र पोलीस दलातील सुमारे 14 हजार पोलीस शिपाई जागांसाठी पोलीस भरतीच्या प्रक्रियेला 9 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. त्यासाठी मागवण्यात आलेल्या ऑनलाईन अर्जांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. परंतु सर्व्हरच्या तांत्रिक अडचणींमुळे 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर राज्यभरातून सुमारे 14 हजार जागांसाठी 18 लाख ऑनलाईन अर्ज आलेले आहेत.

विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच शंभर टक्के तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. 2 ते 4 जानेवारीपर्यंत चालक पदासाठी पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी तर 5 जानेवारीला महिला उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे. 6 ते 14 जानेवारी 2023 पर्यंत पोलीस शिपाई पदासाठी पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार आहे. तर 15 ते 17 जानेवारीपर्यंत पोलीस शिपाई पदासाठी महिला उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे.

Watch Our Latest Video

उमेदवारांच्या ओळखपत्राच्या दोन प्रती, आवेदन अर्जाच्या दोन छायांकित प्रती, सर्व मूळ कागदपत्रे, सर्व कागदपत्रांचा छायांकित प्रतींचा संच, अर्जावर सादर केलेला फोटो (सहा फोटो), आरक्षण, क्रीडा प्रमाणपत्र, चारित्र्य पडताळणी अहवाल, आधारकार्ड, पॅनकार्ड, एलएमव्ही लायसन्स, प्रवेश पत्र ही कागदपत्रे सोबत असणे महत्वाचे आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!