ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट विधानसभेसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू

३९६ मतदान केंद्रावर केली व्यवस्था

अक्कलकोट वृत्तसंस्था 

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघासाठी मतदानाची तयारी पूर्ण झाली असून यासाठी ३९६ मतदान केंद्रावर मतदानाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे. मतदान सुरू झाल आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामीण भागात ९१ मतदान केंद्र आहेत तसेच अक्कलकोट ग्रामीणमध्ये २४०, अक्कलकोट शहरामध्ये ४१, मैंदर्गी शहरामध्ये १३, दुधनी शहरामध्ये ११ मतदान केंद्रावर ही मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. १६७ गावे आणि १५० ग्रामपंचायतीमध्ये ही मतदानाची प्रक्रिया पार पडेल. सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदानयंत्र तसेच इतर साहित्य मतदान केंद्राक्षांकडे सुपूर्द करण्यात आली असून बसने हे सर्व साहित्य मतदान केंद्राच्या ठिकाणी रवाना झाले आहे.

या निवडणुकीमध्ये एकूण मतदार हे ३ लाख ८३ हजार ४७९ असून यात १ लाख ९६ हजार  ५७७ पुरुष ,१ लाख ८६ हजार ८५९ स्त्री तर ४२५ सैनिक मतदार आहेत. तालुक्याची  एकूण लोकसंख्या ही ४ लाख ६३ हजार ५२९ इतकी आहे.निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी दोन्ही तिन्ही पोलीस स्टेशन अंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून संवेदनशील गावांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. अनेक ठिकाणी बाहेरचाही बंदोबस्त मागवण्यात आला असून निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार अनेक गोष्टींमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहे. शासनाची सर्व यंत्रणा सज्ज आहे.मतदाराने आपला पवित्र मतदानाचा हक्क निर्भयपणे  व शांततेत पार पाडावा,असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मतदानाच्या टक्केवारीबाबत उत्सुकता

यावर्षी मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.२०१४ च्या निवडणुकीमध्ये तालुक्यात ६३.४६ टक्के मतदान झाले होते.२०१९ च्या निवडणुकीत ५४.९२ टक्के मतदान झाले होते.यावर्षी किती टक्के मतदान होणार आहे याची उत्सुकता प्रशासनासह तालुक्याला लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!