---Advertisement---

अक्कलकोट व्यापारी महासंघाला नेहमीच सहकार्य राहील

By team
On: November 29, 2024 8:52 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, सोलापूर  

अक्कलकोट व्यापारी महासंघाची भूमिका नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी राहिली आहे. त्यामुळे विकास कामांसाठी व्यापारी महासंघाला माझे नेहमीच सहकार्य राहील, अशी ग्वाही नूतन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली. शुक्रवारी,अक्कलकोट शहरातील सर्व  व्यापारी व महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार कल्याणशेट्टी यांची विक्रमी मताने निवड झाल्याबद्दल पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अक्कलकोटच्या इतिहासात प्रथमच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी विक्रमी विकास  कामे करत जनतेचे मन जिंकले आहे. तसेच स्वतःचाच विक्रम त्यांनी या निवडणुकीत मोडला आहे.अनेक वेळा व्यापारी महासंघाने त्यांच्याकडे सहकार्याची मागणी केली असता त्यांनी नेहमीच व्यापारी व महासंघाच्या मागणीला प्राधान्य घेऊन ते प्रश्न मार्गी लावले आहेत, असे महासंघाचे अध्यक्ष मल्लिनाथ साखरे यांनी सांगितले.सर्व व्यापाऱ्यांनी आमदार कल्याणशेट्टी यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि अशाच पद्धतीने तालुक्याचा विकास करून तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहराला राज्यात एक टॉपचे शहर म्हणून ओळख द्यावी,अशी अपेक्षा व्यक्त केले.

यावेळी उपाध्यक्ष प्रसन्न हत्ते, सचिव नितीन पाटील, कार्याध्यक्ष दिनेश पटेल, खजिनदार प्रकाश उण्णद, सहखजिनदार विजयकुमार कुलकर्णी, महेश हिंडोळे, गजानन पाटील, निनाद शहा, प्रकाश शहा, निरंजन शहा, प्रशांत केसकर, बंटी कलशेट्टी ,राजु शहा, स्वप्निल कुलकर्णी, राजशेखर सोड्डे, रामेश्वर पाटील, प्रवीण शहा, दयानंद बिडवे, खंडप्पा करकी, शिवशंकर पाटील, इरण्णा पाटील, राहुल डागा, स्वामींनाथ आलदी, राजेंद्र भुजंगे इतर बहुसंख्य व्यापारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!