न्यासाच्या कार्याला स्वामीमय शुभेच्छा
परम पूज्य मौनतपस्वी श्री जडेय शांतलींगेश्वर महास्वामीजींचे आशीर्वचन
अक्कलकोट, वृत्तसंस्था
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून भक्ताभिमुख कार्य सुरु असून, मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या नूतन महाप्रसाद गृहाच्या बांधकाम स्थळी गुरुवारी परम पूज्य मौनतपस्वी श्री जडेय शांतलींगेश्वर महास्वामीजी निंबाळ मठ यांनी भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान महास्वामिजींनी संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांना आशीर्वाद देवून प्रकृती स्वास्थाबाबत चौकशी केली. याप्रसंगी मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले, उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, महास्वामिजींचे सेवाधारी समर्थ मानकर, बसवराज माशाळे, दत्तकुमार साखरे, सुरेश पाटील, सागर हळगोदे, भारत पाटील, न्यासाचे लेखा परीक्षक ओंकारेश्वर उटगे, सौरभ मोरे, कायदे विषयक सल्लागार अॅड. संतोष खोबरे, अभियंता किरण पाटील, अमित थोरात, रोहन शिर्के, डॉ.विनायक बुधले, निखील पाटील, प्रविण घाडगे, गोटू माने, सिद्धाराम कल्याणी, एस.के.स्वामी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, राहुल इंडे, पिंटू साठे, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी, पृथ्वीराज पोळ, प्रतिक पोळ, गोविंद शिंदे, स्वामिनाथ बाबर, विशाल कलबुर्गी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
श्रीक्षेत्र अक्कलकोटच्या वैभवात भर
सध्या महाप्रसादगृह इमारतीच्या बांधकामाचे काम सुरु झाले आहे. ही भव्य इमारत ५ मजली असून त्यावर ५१ फुटी श्री स्वामींची मूर्ती असणार आहे. ही इमारत वातानुकुलीत असून, या इमारतीत एकावेळेस २००० भाविक महाप्रसाद घेतील व ५००० भाविक प्रतीक्षेत असतील इतक्या क्षमतेची आहे. ही इमारत श्रीक्षेत्र अक्कलकोटच्या वैभवात भर टाकणारी आहे. गरज ओळखून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांनी नूतन महाप्रसाद गृह उभारणीचा निर्णय म्हणजे दूरदृष्ठी असल्यानेच न्यासाची प्रगती पथावर दिसत आहे. त्यांच्या या कार्याला स्वामीमय शुभेच्छा..!परम पूज्य मौनतपस्वी श्री जडेय शांतलींगेश्वर महास्वामीजी,
निंबाळ मठ