अक्कलकोट, वृत्तसंस्था
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून विविध उपक्रम राबवीत आहेत, दि. ३१ डिसेंबर, मंगळवार रोजी सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरातून भक्त येतात, या मध्ये कोल्हापूर कळंबा येथील श्री स्वामी समर्थ भजनी मंडळाने भजनाचा कार्यक्रम सादर केला.
महाप्रसादालयाच्या प्रांगनात सदरचा कार्यक्रम सादर केला, यामध्ये श्री स्वामी स्वामी समर्थांची गाणी, गणेश वंदना, भजन, कीर्तन,भारुडाचा कार्यक्रम सादर केले, यास स्वामी भक्तांनी भरभरून प्रतिसाद दिला. सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरातून भक्तांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात एकच गर्दी केली होती. या प्रसंगी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, पुरोहित अप्पू पुजारी, विश्वंभर पुजारी, बाळासाहेब पोळ, प्रवीण घाडगे, गोटू माने, निखील पाटील, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, कुमार सलबत्ते, सिद्धाराम कल्याणी, बाळासाहेब घाडगे, श्रीनिवास गवंडी, दत्ता माने, तानाजी पाटील, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर, बसवराज क्यार, अनिल बिराजदार, एस के स्वामी, मल्लिनाथ कोगनुरे, शावरेप्पा माणकोजी, कल्याण देशमुख, विशाल घाडगे, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.