अक्कलकोट, वृत्तसंस्था
एखादी आदर्श आश्रमशाळा कशी असावी यांचे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे नागनहळ्ळी येथील आश्रमशाळा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे सुविधा व शिक्षण मिळावे म्हणून संस्थेचे सचिव जावेद पटेल हे नेहमी झटत आहेत. त्यांच्या प्रयत्नातुन नागनहळ्ळीच्या माळरानावर आदर्श आश्रमशाळा उभारली आहे, असे गौरवोद्गार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी काढले.
नागनहळ्ळी येथील के.बी.एन आश्रमशाळेत आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते सोलार सहा हायमास्ट दिव्यांचे उद्घाटन त्यांच्या करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर यशवंत धोंगडे, महेश हिंडोळे, संस्थेचे सचिव जावेद पटेल, प्राचार्य ईस्माईल मुजावर, मोहन चव्हाण, रजाक सय्यद, ननु कोरबु, प्रतिक मेहता, संस्थेचे उपाध्यक्ष जलील पटेल आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, निवासी विद्यार्थ्यांसाठी बंकर बेड, डायनि़ग हाँल, अद्यावत प्रयोगशाळा यासह विद्यार्थी विद्यार्थींनाना उत्कृष्ट भोजनासोबतच संगीत, गाणे आदी कला जोपासण्यासाठी करत असलेले संस्थेचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. एखादी आदर्श आश्रमशाळा कशी असावी हे नागनहळ्ळी आश्रमशाळे पाहुन लक्षात येते.
याप्रसंगी सलग दुसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल सचिन कल्याणशेट्टी यांचा संस्थेच्यावतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रशालेचे शिक्षक रूद्राक्ष वैरागकर यांनी स्वागतगीत व गीत सादर केले. सुत्रसंचालन व आभार मनोज जगताप यांनी केले तर प्रास्तविक मोहन गुरव यांनी मानले. यावेळी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.