आनंदी राहण्यासाठी कोणतीही गोष्ट छंद म्ह्णून जोपासा
आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार
अक्कलकोट, वृत्तसंस्था
पत्रकार हे अर्थाजर्नासाठी नाही तर आपली आवड वा छंद जोपासण्यासाठी व आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतुन समाजहितासाठी पत्रकारिता करत असतात. विद्यार्थीनीही आपले करिअर कोणतेही निवडले तरी आपल्या स्वतःच्या आनंदासाठी आवड व छंद जोपासा, असे आवाहन आमदार साचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
पत्रकार दिनानिमित्त आमदार कल्याणशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली नागनहळ्ळी येथील आश्रमशाळेत तालुक्यातील पत्रकारांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी आमदार कल्याणशेट्टी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर यशवंत धोंगडे, महेश हिंडोळे, संस्थेचे सचिव जावेद पटेल, प्राचार्य ईस्माईल मुजावर, मोहन चव्हाण, रजाक सय्यद, ननु कोरबु, प्रतिक मेहता, संस्थेचे उपाध्यक्ष जलील पटेल आदी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. आद्य पत्रकार संपादक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. पत्रकार दिनाचे औचित्य साधुन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, बुके देऊन संचारचे पत्रकार मारुती बावडे, नंदकुमार जगदाळे, बाबासाहेब निंबाळकर, स्वामीराव गायकवाड, रमेश भंडारी, चेतन जाधव, योगेश कबाडे आदींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बाबा निंबाळकर, मारूती बावडे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रशालेचे शिक्षक रूद्राक्ष वैरागकर यांनी स्वागतगीत व गीत सादर केले. सुत्रसंचालन व आभार मनोज जगताप यांनी केले तर प्रास्तविक मोहन गुरव यांनी मानले.