ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा सत्ताधाऱ्यांनाच कौल;सर्वपक्षीय आघाडीचा धक्कादायक पराभव

 


अक्कलकोट, दि.३० : संपूर्ण अक्कलकोट तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या अक्कलकोट कृषी बाजार समितीच्या निवडणूकीत पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांच्या बाजूने कौल दिला आहे.या ठिकाणी सत्ताधारी माजी आमदार सिद्रामप्पा पाटील व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या गटाने सत्ता कायम
राखली आहे.या ठिकाणी सर्व पक्षीय आघाडीला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडीने ही निवडणूक अतिशय चुरशीची केली होती.परंतु माजी आमदार पाटील व आमदार कल्याणशेट्टी
यांनी या सर्वांचे मनसुबे पुन्हा उधळून लावले आहेत.अनुभवी नेतृत्वाविरुद्ध युवा नेते असा सामना होता.परंतु पाटील यांनी विरोधी पॅनलला मोठा धक्का दिला आहे.या बाजार समितीसाठी शुक्रवारी ९७.५७ टक्के मतदान झाले होते.१८ जागांसाठी ४२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.१८ पैकी सोसायटीमध्ये १० ,व्यापारी २ अशा १२
जागा भाजपला तर ग्रामपंचायतमधील ४ आणि सोसायटी १ आणि हमाल तोलार १ अशा ६ जागा सर्वपक्षीय आघाडीला
मिळाल्या.विरोधी गटातून सोसायटी मतदारसंघातून केवळ मल्लिकार्जुन पाटील हे विजयी झाले.व्यापारी आणि सहकारी संस्था मतदारसंघामध्ये चुरशीची लढत दिसून आली होती.या निवडणुकीमध्ये
माजी आमदार पाटील व आमदार कल्याणशेट्टी यांच्या पॅनलला माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखालील पॅनलने जोरदार लढत दिली होती.यात गोकुळ शुगरचे अध्यक्ष दत्ता शिंदे, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, आनंद तानवडे, तुकाराम बिराजदार, संजय देशमुख या सर्व पक्ष नेते मंडळींचा समावेश होता.माजी आमदार पाटील
यांनी ही आपली शेवटची निवडणूक आहे,मतदानाच्या आदल्या दिवशी सांगितले होते.त्यामुळे ही निवडणूक अतिशय अटीतटीची व प्रतिष्ठेची बनली होती.या निवडणुकीत वैयक्तिक पातळीवरचे आरोप प्रत्यारोप होऊन
निवडणूक टोकाची झाली होती.मतमोजणी वेळी भाजपकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवानंद पाटील, माजी सभापती संजयकुमार पाटील,आप्पासाहेब पाटील, राजेंद्र बंदीछोडे आदी उपस्थित होते. मतमोजणीनंतर निवडून आलेल्या उमेदवार
व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

उमेदवारनिहाय पडलेली मते –
सहकारी संस्था मतदारसंघ सर्वसाधारण – बाबुराव करपे ( ३५३ विजयी ), सुरेश गड्डी ( ३३१ ) ,बसवराज तानवडे ( ३३४ ), आप्पासाहेब पाटील ( ३५४ विजयी ) ,मल्लिकार्जुन पाटील,( ३५७ विजयी ) संजीवकुमार पाटील ( ३७८ विजयी ),माजी आमदार सिद्रामप्पा पाटील( ३७६ विजयी ), कामगोंडा बाके ( ३४८ विजयी ), धनराज बिराजदार ( ३४० विजयी ), सुमित बिराजदार ( ३२९ ), रविकिरण वरनाळे ( ३२२ ), विठ्ठल विजापुरे ( ३३७ ), कपिल शिंदे ( ३३१ ), महांतेश हत्तुरे (३०९ ), चनमलप्पा हालोळे ( ५ ),
महिला – विठाबाई कलकुटगे ( ८ ), शकुंतला खरात ( ३५० ), शिवमंगल बिराजदार ( ३७० विजयी ),माजी नगराध्यक्षा डॉ.सुवर्णा मलगोंडा ( ३४१ ),पार्वतीबाई स्वामी ( ३५३ विजयी ), इतर मागासवर्गीय – अश्पाक अगसापुरे ( ३४५ ), प्रकाश कुंभार ( ३७७ विजयी ), विमुक्त जाती- भटक्या जमाती – राजेंद्र बंदीछोडे ( ३७७ विजयी ),
शिवयोगी पुजारी( ३४७ ) ,
ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण – मल्लिनाथ ढब्बे ( १७३ ), कार्तिक पाटील( ४४५ विजयी ) ,आदित्य बिराजदार ( १७६ ),रिपाईचे रेवणप्पा मडीखांबे ( ४६ ), शिवयोगी लाळसंगी ( ४१५ विजयी ),निरंजन हेगडे ( ०० ),
अनुसूचित जाती जमाती – यशवंत इंगळे ( १५८ ) ,सिद्धार्थ गायकवाड (४६९ विजयी ), राहुल रुही ( १६ ), आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक – लक्ष्मीबाई पोमाजी ( १८३ ), प्रकाश बिराजदार ( ४६६ विजयी ) ,आडते व व्यापारी मतदारसंघ – विजयकुमार कापसे ( ७४ ), श्रीशैल घिवारे ( ८४ विजयी ), बसवराज माशाळे ( ८४ विजयी ), शंकर माशाळे ( ५ ) ,महंमद हुसेन शेरीकर ( o ) ,हमाल व तोलार मतदारसंघ – उमेश गायकवाड ( ७ ),यल्लप्पा ग्वल ( ५९ विजयी ).

 

पाटील पिता – पुत्रांचा
विजय

सोसायटी मतदारसंघात ज्येष्ठ नेते माजी आमदार सिद्रामप्पा पाटील व माजी सभापती संजीवकुमार पाटील हे दोघेही पिता-पुत्र उभे होते.या दोघांचाही मोठा विजय झाला आहे. वयाच्या ८५ व्या वर्षी माजी आमदार पाटील यांनी ही निवडणूक लढवली होती त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले होते.

धनशक्तीला मतदारांनी
जुमानले नाही

विरोधकांकडून धनशक्तीचा मोठ्या प्रमाणात वापर झाला तरीही मतदार त्याला जुमानले नाहीत आमच्या पॅनलला जनतेने एक हाती सत्ता दिली. त्याबद्दल मी जनतेचे आभार मानतो.सहकार क्षेत्रात आम्ही केलेल्या
कामाचा हा विजय मानतो.

सिद्रामप्पा पाटील,माजी आमदार

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!