ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट लायन्सने केला नामवंत डॉक्टरांचा सत्कार !

कृषी दिन,डॉक्टर्स डे व सीए डे निमित्त कार्यक्रम

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

लायन्स क्लबच्यावतीने डॉक्टर्स डे निमित्त शहरातील नामवंत डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.लायन्सने राबविलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे डॉक्टरांनी समाधान व्यक्त केले.क्लबचे अध्यक्ष शिवानंद नंदर्गी याच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.यावेळी डॉ.योगेश वेळापूरकर,डॉ.आशुतोष जाधव,डॉ.अमृता  कोटी,डॉ.आर.व्ही.पाटील ,डॉ.आयनळे, डॉ. विवेक करपे, डॉ.मनोहर मोरे, डॉ.साहेराबेगम मोमीन,डॉ.राहुल लिंबीतोटे, डॉ.अरुण परिचारक यांचा सत्कार करण्यात आला.सीए डे निमित्त देखील ओंकारेश्वर उटगे व शुभम चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.आदर्श शेतकरी म्हणून कृषी दिनानिमित्त शेतकरी उमेश कापसे व प्रमोद पाटील यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना सीए उटगे म्हणाले, दरवर्षी लायन्स क्लब विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करते ही बाब त्या क्षेत्रातील व्यक्तींसाठी सुखावह आहे त्यांना या सत्कारातून बळ मिळते.या कार्यक्रमास माजी प्रांतपाल राजशेखर कापसे,महिबुब सलगरकर,सुनिल बिरादार,डॉ.प्रदीप घिवारे,प्रभाकर मजगे, शिवशरण खुबा,चंद्रकांत वेदपाठक,सिद्धया मठ आदी उपस्थित होते.प्रास्ताविक व स्वागत सचिव सुधीर माळशेट्टी यांनी केले.सूत्रसंचालन सुभाष गडसिंग यांनी केले तर आभार गौरीशंकर चनशेट्टी यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!