अक्कलकोट, दि.५ : अक्कलकोट ते
उमरगा मार्गावर अखेर अक्कलकोट आगाराच्या एसटी बसेस सोडण्यात आले आहेत त्यामुळे प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे.
सध्या दिवसातून तीन फेऱ्या सुरू करण्यात आले आहेत. मुक्काम गाडी अद्याप सोडण्यात आलेली नाही. एसटीचा संप सुरू होण्यापूर्वीपासून त्या गाड्या बंद होत्या. कोरोना काळातही या मार्गावरील गाड्या विस्कळीत झाल्या होत्या.याबाबत नुकतेच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर बनसोडे यांनी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. याबाबत विभाग नियंत्रक यांनाही संपर्क साधण्यात आला होता. त्यानंतर अक्कलकोट आगाराने तात्काळ हालचाली करत आगार प्रमुख रमेश मंता, वाहतूक नियंत्रक मदनसिंह घाडगे,मल्लय्या मसूती यांनी हालचाली करून निवेदनाची दखल घेत गाड्या सुरू केल्या आहेत. यामुळे केसरजवळगा, मुरूम, दाळिंब, आलूर,बोळेगाव,भुरीकवठे, वागदरी, शिरवळ मार्गावरील प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे. अक्कलकोट आगाराच्यादृष्टीने हा मार्ग उत्पन्नाच्या बाबतीत ए – वन प्लस आहे. त्यामुळे या मार्गावर जास्तीत जास्त गाड्या सोडून प्रवाशांची सोय करावी, अशी मागणी या भागातील प्रवासी वर्गातून होत आहे.
मुक्काम गाडी
पुन्हा सुरू करावी
पूर्वी अक्कलकोट आगाराची एक बस उमरगा मुक्कामाला असायची.ती गाडी सकाळी सात वाजता उमरग्यातून सुटते.ती सकाळची गाडी पुन्हा सोडावी. जेणेकरून सकाळी अक्कलकोटला कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची चांगली सोय होईल.याबाबत अधिकाऱ्यांनी विचार करावा.
काशिनाथ क्षीरसागर,माजी सैनिक
( केसर जवळगा)