ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट कारंजा चौक नवरात्र ट्रस्टने अनाथांना केली मदत ;सामाजिक बांधिलकी जोपासत थंडीत दिले स्वेटर

 

अक्कलकोट, दि.१० : जगात श्रीमंतांना कोणीही
मदत करतो परंतु गरीब आणि अनाथ
मुलांना मदत करणे फार महत्त्वाचे असते याच
विचाराने अक्कलकोट येथील कारंजा चौक नवरात्र ट्रस्टने सामाजिक बांधिलकी जोपासत शहराच्या विविध भागात असलेल्या ६३ गरीब अनाथ मुलांना स्वेटरचे वाटप केले आहे.सध्या थंडी वाढली आहे यामुळे अनाथ मुलांना व त्यांच्या कुटुंबियांना याचा प्रचंड त्रास होत आहे.ही बाब लक्षात घेऊन ट्रस्टचे अध्यक्ष सुधीर माळशेट्टी यांनी शहराच्या विविध भागात जाऊन स्वतः लहान मुलांना आणि त्याच्या कुटुंबाला स्वेटर दिले आहेत.बासलेगाव रोड, ए- वन चौक,संजय नगर झोपडपट्टी या भागात अनाथ मुलांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे.त्या ठिकाणी याचे वाटप करण्यात आले.यावेळी फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे
माजी अध्यक्ष बाबा निंबाळकर,केदार माळशेटटी,चेतन कलशेट्टी,म्हाळप्पा पुजारी,बबलू भागानगरे,सैपन बिराजदार आदी पदाधिकारी उपस्थित होते.यंदाचे
ट्रस्टचे हे ४८ वे वर्ष आहे. दरवर्षी काही ना काही उपक्रम आम्ही या ट्रस्ट मार्फत राबवत असतो.यावर्षी अनाथ मुलांचा विचार करून हा उपक्रम राबविला आहे.अजूनही समाजात असे अनेक घटक आहेत ज्याच्याबद्दल
इतर संस्थांनी विचार करण्याची गरज आहे.
मागच्या दिवाळीमध्ये आम्ही उसाच्या फडात जाऊन तीनशे जणांना दिवाळी फराळ वाटप केले होते,असे उपक्रम संस्थेमार्फत यापुढेही चालू ठेवणार असल्याचे अध्यक्ष माळशेट्टी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!