अक्कलकोट तालुक्यातील ‘त्या’ २८ गावांसाठी विशेष पॅकेज जाहीर करा; रासपची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
अक्कलकोट,दि.११ : विविध सोयींसुविधा
अभावी अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील २८ गावे कर्नाटकात जाण्याच्या विचारत आहेत असे असताना त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत पण या गावांना विशेष पॅकेज जाहीर झाल्यास हा प्रकार थांबेल असे सांगत महाराष्ट्र सरकारने विकासासाठी कर्नाटक सिमालगत असणाऱ्या तालुक्यांना विशेष पॅकेज जाहीर करावे,अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.मुख्यमंत्री शिंदे हे गुरव समाजाचे अधिवेशनासाठी सोलापूर येथे आले
असता विमानतळावर त्यांनी हे निवेदन दिले.मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या पंधरा दिवसांपासून महाराष्ट्र – कर्नाटक सिमावाद चालू आहे.महाराष्ट्र राज्यातील कर्नाटक सिमालगत असलेल्या तालुक्यातील काही गावांनी ग्रामपंचायतीचा ठराव करुन आम्हाला कर्नाटकमध्ये जायचे आहे अशी मागणी केली आहे.ही बाब लाजिरवाणी आहे.कारण देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत अजून सिमालगत असणाऱ्या तालुक्यातील गावांना रस्ते, वीज, पाणी, आरोग्य व शिक्षण या मुलभूत सुविधा उपलब्ध झाली नाही.येथील जनतेचा सरकारवर प्रचंड रोष असून मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे.तरी महाराष्ट्र शासनाने त्वरित यावरती उपाय म्हणून कर्नाटक सिमालगत असणाऱ्या तालुक्यांना विशेष पॅकेज जाहीर करावे, जेणेकरून येथील जनता कर्नाटकमध्ये जाण्यापासून थांबेल. कारण आजपर्यंत महाराष्ट्र शासनाकडून सिमालगत असणाऱ्या तालुक्यातील गावाकडे दुर्लक्ष होत आले आहे.कुणीही याकडे विशेष असे लक्ष दिले नसल्याने या गावाचा विकास झाला नाही.येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनीनी देखील या गावांकडे लक्ष
न दिल्याने हा भाग चौफेर विकासापासून वंचित राहिला आहे.तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरात लवकर या भागासाठी विशेष पॅकेज जाहीर करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर यांनी दिले आहे.याप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय माडकर, शिंदे गटाचे तालुका उपप्रमुख उमेश पांढरे, शेखर भंगाळे, धोंडीबा कुंभार, रवी लवटे आदी उपस्थित होते.