---Advertisement---

हरिदास जाजनुरे यांना जीवनगौरव ;सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे पुरस्कार जाहीर ; शनिवारी अक्कलकोटमध्ये होणार वितरण

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.१३ : सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या पुरस्कारांची घोषणा संघाचे अध्यक्ष भारत इंगवले व कार्याध्यक्ष मुकुंद साळुंके यांनी केली.यामध्ये जीवन गौरव ,आदर्श मुख्याध्यापक,आदर्श शिक्षक ,आदर्श लिपीक यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.या पुरस्काराचे वितरण शनिवार दि.१६ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता अक्कलकोट येथे होणार आहे.या पुरस्काराचे वितरण आमदार
सचिन कल्याणशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली
व आमदार जयंत आसगावकर,माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे,वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे,अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते
होणार आहे.तरी सर्व शिक्षक बांधवांनी दुपारी १२ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन उपाध्यक्ष उत्तम हानपुडे,सचिव
सचिन झाडबुके,संभाजी वागज,मोहन गायकवाड ,विजय वाघमोडे, गणेश यादव ,यशवंत तिवारी,निलकंठ लिंगे,
मकरंद अंकलगी, रोहिदास साळुंके आदींनी केले आहे.

हे आहेत पुरस्काराचे
मानकरी

हरिदास जाजनुरे ( जीवन गौरव ), सिद्धाराम सोलापूरे,सुरेश पिरगोंडे, सचिन चव्हाण , संतोष अंकलगी, सुनील गायकवाड , रावसाहेब जाधव, महादेव खरात,बाळासाहेब शिंदे,अवंती पटवर्धन, श्रीमंत बनसोडे,अर्जुन बनसोडे,अनिल वैद्य, खंडेराव शिंदे, वसंत अरेनवरु, प्रभाकर राजगुरू आदीं मान्यवरांना या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!