विकासात सावंत बंधूंचे योगदान महत्त्वाचे;प्रा.शिवाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट येथे आरोग्य शिबीर
अक्कलकोट,दि.१२ : राज्यात भाजप – शिवसेनेची सत्ता आल्यापासून अनेक विकास कामे होत आहेत त्यात सोलापूर
व उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासात सावंत बंधूंचे योगदान महत्त्वाचे आहे.प्रा.शिवाजीराव सावंत हे तर बहुआयामी व्यक्तिमत्व आहे,असे प्रतिपादन शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय देशमुख यांनी केले.शिवसेनेच्यावतीने जिल्हा
संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथे आरोग्य तपासणी शिबीर
व फळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.अक्कलकोट तालुका शिवसेनेच्यावतीने ठेवण्यात आले होते.प्रारंभी माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.रासपा पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
रिपाई तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे,माजी नगराध्यक्षा डाॅ. सुवर्णा मलगोंडा,स्वामीनाथ हेगडे, वर्षा चव्हाण, वैशाली हावनूर ,उमेश पांढरे, विनोद मदने यांच्या उपस्थितीत प्रतिमा पुजा करुन कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.यावेळी कर्करोग तज्ञ डाॅ. प्रथमेश मलगोंडा यांनी कर्करोग निदान व उपचार याबद्दल माहिती दिली.कर्करोगाला घाबरुन जाऊ नये. तो उपचाराने कमी होऊ शकतो,असे डॉ. मलगोंडा म्हणाले. सर्व मान्यवरांचा सत्कार डॉ. अशोक राठोड व डॉ.अश्विन करजखेडे यांनी केले.प्रास्ताविक तालुका प्रमुख देशमुख यांनी केले.यावेळी सुनील बंडगर, अविनाश मडीखांबे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ५४८ रुग्णांना तपासून योग्य ते उपचार करण्यात आले.या रुग्णांना महिला आघाडीच्यावतीने फळे वाटप करण्यात आले. यावेळी चंद्रकांत वेदपाठक, अश्विनी पाटील, लता गायकवाड, इंदुमती वाघमारे ,जयश्री कोलाटी ,अप्पासाहेब धुमाळ, परशुराम जाधव ,लक्ष्मण पुजारी, विशाल वांजरे, पप्पू गुरव, महिबुब शाबादे आदिंसह आशा वर्कर्स ,ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टर्स, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार प्रा.सुर्यकांत कडबगावकर यांनी मानले.