---Advertisement---

सरपंच उमेश पाटील यांच्या वाढदिनी उद्या चपळगावात कार्यक्रम

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.१६ : अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील सरपंच तथा मनीषा ऍग्रोचे सर्वेसर्वा उमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चपळगाव येथे उद्या मंगळवार (दि.१७ ऑक्टोबर ) रोजी बुद्धराष्ट्र युवा प्रतिष्ठानतर्फे
नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पाटील मित्र परिवाराने दिली आहे.यानिमित्त ग्रामस्थांच्यावतीनेही त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा होणार आहे.चपळगाव येथील विविध विकास कामात त्यांचे
योगदान महत्वपूर्ण आहे.ते उच्चशिक्षित आणि सुशिक्षित असल्याने नेहमी या परिसराच्या विकासासाठी धडपडत असतात.चपळगाव येथील डीसीसी बँकेच्या समोरील प्रांगणात सायंकाळी ६ वाजता आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते व गोकुळ शुगरचे अध्यक्ष दत्ता शिंदे, बॉबी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अजित गायकवाड,महेश गजधाने, बसवराज बाणेगाव आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.या सत्कार सोहळ्यामध्ये संतोष
नगर मित्र मंडळ, श्री बसवेश्वर तरुण मंडळ (बसवनगर ),श्री बसवेश्वर तरुण मंडळ भंडारकवठे गल्ली, शिवप्रेमी तरुण मंडळ, महात्मा फुले तरुण मंडळ, जय भवानी तरुण मंडळ, मधला मारुती तरुण मंडळ ,शिवछत्रपती प्रतिष्ठान यांच्यातर्फे सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी परिसरातील विविध गावचे सरपंच,प्रमुख नेतेमंडळी, संस्थांचे पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन मित्र परिवाराने केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!