ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिरवळवाडी घटनेत पोलिसांनी दाखवलेली संवेदनशीलता प्रेरणादायी;स्वामी समर्थ प्रेस असोसिएशनच्यावतीने जीवनदात्यांचा गौरव

 

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट, दि.२३ : अक्कलकोट तालुक्यातील शिरवळवाडी नजीक सोमवारी घडलेली घटना आणि त्यात पोलिसांनी दाखवलेली सतर्कता व संवेदनशीलता ही समाजासाठी आणि पोलीस विभागासाठी निश्चितच प्रेरणा देणारी आहे,असे प्रतिपादन नूतन उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांनी केले.बुधवारी,अक्कलकोट
येथील सर्जेराव जाधव सभागृहात श्री स्वामी
समर्थ मराठी प्रेस असोसिएशनच्यावतीने
पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांचा ‘जीवनदाते’ म्हणून सत्कार करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.पुढे बोलताना गौर म्हणाले,पोलीस आणि पत्रकार यांनी समन्वयाने मिळून काम केले तर समाजामध्ये निश्चित बदल घडेल.अडचणीच्या काळामध्ये पोलीस मदतीला धावून येतात हे शिरवळवाडीच्या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.या घटनेमध्ये पाच लोकांचे
जीव वाचले ही बाब निश्चितच पोलिसांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी समाधानकारक आहे.अशा घटनांमुळे समाजामध्ये चांगला संदेश जाईल,असेही ते म्हणाले. पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी म्हणाले,पत्रकार संघाने या कामाची नोंद घेऊन आमचा सर्वांचा सत्कार केला.त्यामुळे आम्हाला पण पुढील कामासाठी बळ मिळाले आहे.यापुढेही अशाच प्रकारे चांगले पोलीस प्रशासन अक्कलकोट तालुक्याला देण्याचा प्रयत्न करु.जनतेने देखील प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर यांनी केले.यावेळी पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी,सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी,पोलीस उपनिरीक्षक रियाज मुजावर सहाय्यक पोलीस फौजदार व्यंकटेश सुतार
पोलीस हेडकॉन्स्टेबल विपिन सुरवसे,
राम चौधरी,अनिल चव्हाण ,गजानन शिंदे ,
सतीश आवले,रणजित अवताडे,शिवलिंगय्या स्वामी,बशीर शेख या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शाल, श्री स्वामी समर्थांची प्रतिमा, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. नूतन उपविभागीय पोलिस अधिकारी गौर यांचाही संघाच्यावतीने सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. वारकरी सेवा मंडळाच्या जिल्हाप्रमुखपदी उपाध्यक्ष सैदप्पा इंगळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी कार्याध्यक्ष मारुती बावडे,सचिव शिवानंद फुलारी,अनंत अंबुरे,विरुपाक्ष कुंभार, बसवराज बिराजदार,रविकांत धनशेट्टी आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश कबाडे यांनी केले तर आभार यशवंत पाटील यांनी मानले.

थरारक अनुभव आणि सर्वांच्या
अंगावर शहारे

सोमवारी रात्री पावणे दहा ते दोन वाजेपर्यंत जो घटनाक्रम झाला तो पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी आणि सर्वांसमोर कथन केला.हा थरारक अनुभव सांगताना उपस्थितांच्या अंगावर शहारे उमटले पोलिसांच्या या तत्परतेबद्दल सर्वांनी कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!