अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
दि.३ : ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी वाव असून शासन त्यांना विविध प्रकारच्या सवलती देत आहे. त्याचा लाभ ग्रामीण विद्यार्थिनींनी घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी शंकर कवीतके यांनी केले.महिला बालकल्याण विभाग,जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडून शाळेपासून लांब राहणाऱ्यां विद्यार्थिनींना शाळेला ये जा करण्यासाठी मोफत सायकल देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.या अंतर्गत जिल्हा परिषद कन्नड मुली शाळा मैंदर्गी या शाळेतील सहा मुलींना मोफत सायकल वाटप करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.हा कार्यक्रम अक्कलकोट पंचायत समिती येथे पार पडला.
यावेळी गटविकास अधिकारी शंकर कवितके यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.गटशिक्षण अधिकारी प्रशांत अरबाळे म्हणाले, ग्रामीण भागातील मुली व खूप जिद्दी आणि कष्टी असतात. बऱ्याच वेळा मदतीची गरज असते. सायकल वाटप हा एक त्या मदतीचा भागच आहे असे त्यांनी सांगितले.यावेळी केंद्रप्रमुख इंद्रसेन पवार,उपसरपंच काशिनाथ कुंभार, मोनेश्वर नरेगल,विजयकुमार चव्हाण, अनिल बिराजदार ,शिवानंद गोगाव, मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी आदिंसह लाभार्थी, विद्यार्थिनी, पालक उपस्थित होते.