ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबत यावे ; संजय राऊत

मुंबई: वृत्तसंस्था

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सर्वाधिक जागा मिळण्याची मागणी केली आहे. आंबेडकर स्वाभिमानी आणि लढाऊ नेते आहेत. महाविकास आघाडीसोबत यावे, अशी आमची इच्छा असून त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. योग्य निर्णय याबाबत घेतला जाईल, अशी माहिती शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या चर्चेत वंचित असमाधानी असल्याने महाविकास आघाडीत धुसफूस वाढली आहे. आंबेडकरांनी आघाडीकडून किमान जागा मिळवण्यासाठी दबाव वाढवला आहे. राऊत यांनी यावरून आंबेडकरांच्या मनधरणीचा प्रयत्न केला. आंबेडकर आणि त्यांचे कार्यकर्ते सर्वाधिक जागा मिळाव्यात, यासाठी आग्रही आहेत. परंतु भाजपचा पराभव करायचा झाल्यास एकत्र लढणे गरजचे आहे आंबेडकर स्वाभिमानी आणि लढाऊ नेते आहेत. महाविकास आघाडीसोबत त्यांनी कायम राहावे, अशी आमची सर्वांची इच्छा आहे. वारंवार त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. त्यांची बाजू समजून घेत आहोत. लवकरच त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे राऊत म्हणाले.

स्वाभिमानासाठी शिवसेना सोडली, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली होती. अजित पवारांनी ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवले. आता लोकसभेच्या अवघ्या दोन-चार जागांसाठी त्यांच्यावर विनवणी करण्याची वेळ आली आहे, असे म्हणत राऊत यांनी भाजप, शिंदे आणि अजित पवारांवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आमदार रोहित पवारांच्या साखर कारखान्यावर केलेल्या कारवाईविरोधात त्यांनी संताप व्यक्त केला. धाडी टाकून, संपत्ती जप्त करून बदनामी केली जात आहे. परंतु अजित पवार, अशोक चव्हाण, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ आदी ज्यांच्यावर आरोप केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!