---Advertisement---

अंजली दमानियांची संघासह भाजपवर कडवी टीका !

By team
On: October 14, 2025 5:39 PM
Follow Us:
---Advertisement---

नागपूर : वृत्तसंस्था

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंगळवारी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप व भाजपची मातृसंस्था असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कडवी टीका केली आहे. त्यांनी रस्ते बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराचा पैसा भाजप व संघाच्या तिजोरीत जात असल्याचा आरोप करत पूर्वीच्या संघाच्या तुनलेत आत्ताचा संघ पूर्णतः वेगळा असल्याचा आरोप केला आहे.

अंजली दमानिया यांनी मंगळवारी एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात रेल्वे उड्डाणपूलावरील एक रस्ता खचल्याचे दिसून येत आहे. यावरून दमानिया यांनी नितीन गडकरी, भाजप व संघावर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, भ्रष्टाचार, भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार. नितीन गडकरी, मला खात्री आहे की या भ्रष्टाचाराच्या पैशाचा एक भाग तुमच्या पक्षाच्या निधीत जातो. पण यातील काही कोटी रुपये नागपूर आणि दिल्लीतील आरएसएस कार्यालयाच्या बांधकामासाठी देणग्या म्हणूनही जातात. हे माझ्यासाठी लज्जास्पद आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ज्याचा अर्थ “नॅशनल व्हॅल्यून्टियर ऑर्गनायझेशन” असा होतो. पण आता ही संघटना भ्रष्टाचाराच्या नवीन राजकी यनियमांशी जुळवून घेताना दिसून येत आहे. आरएसएस खरोखरच देशासाठी जबाबदार असणाऱ्या लोकांचा समूह असता तर त्यांनी तुम्ही केलेल्या फसवणुकीविषयी तुम्हाला काढून टाकले असते. अदानी व अंबानी यांनी सर्व मालमत्ता, बंदरे, विमानतळ, जमीन व जंगले पूर्णपणे ताब्यात घेतली आहेत. पण आरएसएसला हे मान्य आहे असे दिसते. त्यामुळे अशा संघटनेला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणता येणार नाही.

माझे वडील पूर्वी या संघटनेचा भाग होते. त्यामुळे मी या संघटनेचा अनादर होईल असे शब्द वापरणार नाही. पण मी फक्त एवढेच म्हणेन की, भूतकाळातील आरएसएस व आत्ताची आरएसएस हे एकमेकांपासून फार वेगळे आहेत, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!