---Advertisement---

आम्हा गोवेकारांना अन्नछत्र मंडळ हे श्रद्धास्थान ; गोवाचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत !

By team
On: October 29, 2024 4:16 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : प्रतिनिधी

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले अन्नदान श्रेष्ठ दान असून, सर्वात मोठे नित्य अन्नदान होत आहे. न्यासाकडून होत असलेले स्वामी कार्य हे उल्लेखनीय असून, आम्हा गोवेकारांना अन्नछत्र मंडळ हे श्रद्धास्थान असल्याचे मनोगत गोवाचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकुटुंब आले असता, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भाजपा महाराष्ट्र सह प्रभारी सौ.सुलक्षणाताई प्रमोद सावंत यांच्यासह सौ.शांभवीताई सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह आदीजन उपस्थित होते.

यावेळी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, शहाजीभाऊ पवार, मनोज निकम, अरविंद शिंदे, ऋशाल येळेगावकर, दिलीपभाऊ सिद्धे, संजय देशमुख, अविनाश मडीखांबे, शिवराज स्वामी, मोतीराम राठोड, शिवशरण जोजन, अविनाश महागांवकर, महेश हिंडोळे, मल्लिनाथ स्वामी, प्रभाकर मजगे, सिद्धराम मठपती, संदीप कत्ते, नागेश कुंभार, लखन झंपले, कांतु धनशेट्टी, राजू झिंगाडे, मल्लिनाथ आळगी, व न्यासाचे आप्पा हंचाटे, निखिल पाटील, गोटू माने, सौरभ मोरे, व मंडळाचे पुरोहित संजय कुलकर्णी, प्रवीण घाडगे, राहुल इंडे, सिद्धाराम कल्याणी, एस.के.स्वामी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, बाबूशा महिंद्रकर, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, राजू पवार, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!