ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाराष्ट्राला नपुंसक बनवत आहात का?; संजय राऊतांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था

छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे वरण-भात तुप खाऊन लढायला गेले का? ते मांस खात होते.बाजीराव पेशवे देखील मांस खात होते, त्याशिवाय युद्धावर लढता येत नाही. आता सीमेवरच्या सैन्याला सुद्धा मांस खावेच लागते. वरण-भात तूप पोळी श्रीखंड खाऊन युद्ध लढता येत नाही, तुम्ही महाराष्ट्राला नपुंसक बनवत आहात, असे म्हणत उबाठाचे नेते संजय राऊत यांनी स्वातंत्र्यदिनी मांसविक्री आणि कत्तलखाने बंद या निर्णयावरून सरकारवर टीकास्त्र डागले आहे.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राला कुणाच्या दबावाखाली शाकाहारी राज्य घोषात केले आहे का? असा सवाल उबाठाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. तर मुंबई-पुण्यासारख्या शहरामध्ये नॉन व्हेज खाणाऱ्यांना प्रवेश दिला जात नाही, घर विकले जात जात नाही यावर संघर्ष सुरूच आहे. आता 15 ऑगस्ट रोजी मनपा फतवा काढते मांस विक्रीवर बंदी आणते. स्वातंत्र्यदिन हा आनंद साजरा करण्याचा दिन आहे, हा धार्मिक उत्सव नाही हा शौर्य दिवस आहे. हे स्वातंत्र्य देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळालेले नाही.

संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस म्हणतात काँग्रेसच्या काळात त्यांचे सोडा तुमच्या काळात काय सुरू आहे. काहीही झाले की ही लोक काँग्रेसच्या काळात हे झाले म्हणतात. तुमच्या स्वप्नात सुद्धा तुमच्या छातीवर काँग्रेस बसलेली आहे. यांना काहीही विचारा काँग्रेसच्या काळात असे म्हणतात. तुम्ही काय महाराष्ट्राला नपुंसक बनवत आहात का?

संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राला कुणाच्या दबावाखाली शाकाहारी राज्य घोषात केले आहे का? असा सवाल उबाठाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. तर मुंबई-पुण्यासारख्या शहरामध्ये नॉन व्हेज खाणाऱ्यांना प्रवेश दिला जात नाही, घर विकले जात जात नाही यावर संघर्ष सुरूच आहे. आता 15 ऑगस्ट रोजी मनपा फतवा काढते मांस विक्रीवर बंदी आणते. स्वातंत्र्यदिन हा आनंद साजरा करण्याचा दिन आहे, हा धार्मिक उत्सव नाही हा शौर्य दिवस आहे. हे स्वातंत्र्य देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळालेले नाही. स्वातंत्र्य मिळावे यासाठी अनेकांनी बलिदान दिले, त्यात भाजपचा आणि मांस न खाणाऱ्याचा काही संबंध नव्हता. सरकारकडे मागणी केली कुणी की स्वातंत्र्यदिनी मांस विक्री करु नये अशी. हे काय नवीन थोतांड आहे, यांचे जनक कोण आहेत.

संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे फतवे मागे घ्या. तुम्ही मराठी माणसाची संस्कृती आणि संस्कार संपवत आहात. स्वातंत्र्यदिनी काय नवीनच सुरू केले की मांसाहार करायचा नाही,तुम्ही नका ना खाऊ. तुम्ही लपून खात आहोत ना मग लोकांवर बंदी का लादत आहात? प्रत्येक प्रकारची बंदी लोकांवर लादली जात आहे. हे खाऊ नका, हे बोलू नका, हे कपडे घालू नका. हा महाराष्ट्र आहे का बंदी राष्ट्र असा संतप्त सवाल राऊतांनी केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, रेडे कापून सरकार आले तेव्हा काही लोकांनी रेड्याचे मांस प्रसाद म्हणून खाल्ले आहे. मला माहिती आहे मी तिथे होते नंतर. गुवाहटीमध्ये बकरे, रेडे, बदक खाणाऱ्यांना मांस बंदी करावी वाटते मला याचे आश्चर्य वाटत आहे. गुवाहाटीची ती एक परंपरा आहे, प्राणी कापून त्यांचा प्रसाद ठेवला जातो, तो काही लोकांनी खाल्ला ही आणि ते आम्हाला शाकाहारी व्हा असे सांगतात.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!