ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विधाते परिवार कडून ग्रामस्थांच्या सोयीसाठी बैठक बाकड्यांची व्यवस्था

दक्षिण सोलापूर : प्रतिनिधी

तालुक्यातील  मौजे आचेगाव येथे विधाते परिवार तर्फ ग्रामस्थांच्या सोयीसाठी उपयुक्त ठरणारा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आहे.
कै. भिमाशंकर बाबुराव विधाते (वडील) यांच्या स्मरणार्थ ग्रामपंचायत आचेगाव चावडी कट्टा येथे 11बैठक बाकड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

या उपक्रमामुळे ग्रामस्थांना बसण्यासाठी तसेच सामाजिक संवाद साधण्यासाठी एक सुसज्ज ठिकाण उपलब्ध झाले आहे. विधाते परिवार च्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून तसेच सामाजिक वर्तुळांतून सर्वत्र कौतुक होत आहे.

या सामाजिक कार्याबद्दल रवी कारभारी विधाते यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढाकाराचे सर्वत्र स्वागत होत आहे. उपस्थिती.. सरपंच सौ विश्रांती शावरसिध्द पाटील उप सरपंच श्री रफिक मुल्ला… ग्रामपंचायत सर्व सदस्य… व कर्मचारी.. पोलिस पाटिल प्यारन मुल्ला,श्री अशोक पाटील, शीलू खांडेकर, सिद्धू पाटील, चंदू शिलेनी, काशिनाथ क्षीरसागर, प्रदीप पाटील, नानासाहेब पाटील, संजय बहिर्जे, शिवानंद उपाध्ये, अजिंक्य बिराजदार सचिन चव्हाण, अमर साळुंखे अनिल कलशेट्टी लक्ष्मण जमादार लक्ष्मण बिराजदार हिराचंद उपाध्ये,

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!