मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून दुसरीकडे निवडणूक आयोग आज महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. निवडणूक आयोग दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन विधानसभा निवडणुकांप्रमाणे एकाच टप्प्यात मतदान होऊ शकते. तर झारखंडमध्ये पाच टप्प्यात मतदानाचा कल कायम ठेवला जाऊ शकतो.
महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर 2024 रोजी, तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2025 रोजी संपत आहे. मागील 2 विधानसभा निवडणुका: महाराष्ट्रात एका टप्प्यात आणि झारखंडमध्ये 5 टप्प्यात झाले मतदान
महाराष्ट्रात गेल्या दोन वेळापासून (2014 आणि 2019) एकाच टप्प्यात निवडणुका होत आहेत. 2014 मध्ये 15 ऑक्टोबर रोजी सर्व 288 जागांसाठी मतदान झाले होते. तर 2019 मध्ये 30 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान झाले होते.
तर झारखंडमध्ये गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये प्रत्येकी पाच टप्प्यांत मतदान झाले आहे. 2014 मध्ये 25 नोव्हेंबर, 2 डिसेंबर, 9 डिसेंबर, 14 डिसेंबर आणि 20 डिसेंबर रोजी मतदान झाले. तर 2019 मध्ये 30 नोव्हेंबर, 7 डिसेंबर, 12 डिसेंबर, 16 डिसेंबर आणि 20 डिसेंबर रोजी मतदान झाले.