मुंबई : वृत्तसंस्था
आगामी लोकसभा निवडणुका आणि मनसेचा गुढीपाडवा मेळावा असे समीकरण जुळून आल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. महायुतीत सामील होण्याची चर्चा कुठे येऊन थांबली आणि भविष्यातील पक्षाची वाटचाल कशी असेल, याबाबत राज ठाकरे हे पक्ष कार्यकर्त्यांना उद्या मार्गदर्शन करणार आहेत. यातूनच लोकसभा लढविणार की थेट विधानसभा, महायुतीला पाठिंबा देणार का, यांसह अनेक प्रश्नांची उत्तरे शिवाजी पार्क येथील मेळाव्यातून मिळणार आहेत.
२०१४ आणि २०१९ अशा सलग दोन लोकसभा निवडणुका न लढणाऱ्या मनसेने २०२४च्या निवडणुकीतील भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. राज ठाकरे यांनी मध्यंतरी नवी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरही मनसेची राजकीय भूमिका गुलदस्त्यात आहे. यावर राज आपले मौन सोडतील