तुळजापूर – आदीमाया आदिशक्ती कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी माता
दसऱ्यादिवशी सिमोल्लंघन झाल्यानंतर तुळजाभवानी माता ५ दिवस श्रम निद्रा घेते. त्यानंतर अश्विन पोर्णिमेदिवशी पहाटे लवकर तुळजाभवानी माता सिंहासनावर आरूढ झाली आहे.
बुधवारी देवीच्या मूळ अष्टभूजा मूर्तीची विधीवत पूजा करण्यात आली.देवीच्या मंदिरात बुधवारी अश्विन पौर्णिमेनिम्मित आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. त्यासोबतच करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिराचा परिसर उजळून निघाला आहे.ही सजावट करण्यासाठी ५ टन देशी तर ७ टन विदेशी फुले लागली आहेत. ही फुले परराज्यातुन मागविण्यात आली होती आई तुळजाभवानी मातेचा दरबारात आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईमुळे परिसर नयनरम्य दिसत आहे.
सजावटीसाठीमध्ये त्रिशूल, फुलपाखरु, साप, हरीण असे प्राणी फुलातून साकारण्यात आले. महाद्वारासमोर आई भवानी मातेची मुर्ती साकारण्यात आली आहे,या सजावटीमुळे मंदिराच्या सौंदर्यात भर पडली आहे. दरवर्षी अश्विन पौर्णिमेला तुळजाभवानी देवीच्या मंदिरात मोठी यात्रा भरते. परिसरातून लाखो भाविक चालत तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिरातील फुलांची सजावट पुणे येथील आर. आर. किराड हे दरवर्षी मोफत करतात.