---Advertisement---

अखेर नाना पटोलेंविरुद्ध भाजपचा उमेदवार ठरला

By team
On: October 28, 2024 4:53 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली वृत्तसंस्था 

साकोली मतदारसंघातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध भाजपाचा उमेदवार अखेर ठरला. भाजपमधील सर्व इच्छुकांना डावलून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून २४ तासांपूर्वी भाजपमध्ये सामील झालेले अविनाश ब्राह्मणकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. आतापर्यंत भाजपच्या दोन याद्यांमध्ये १२२ उमेदवार जाहीर करण्यात आले. आज (सोमवारी) भाजपची तिसरी यादी जाहीर झाली असून यामध्ये २५ उमेदवार जाहीर करण्यात आले.

भाजपच्या पहिल्या दोन याद्यांमध्ये साकोली विधानसभा मतदारसंघाचा समावेश नव्हता. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध भाजपचा उमेदवार कोण ?, अशा चर्चा दिल्लीपासून गल्लीपर्यंत होत्या. अखेर भाजपने यावर निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव तथा जि. प. सदस्य अविनाश ब्राम्हणकर यांना उमेदवारी दिली आहे. तिसऱ्या यादीत याची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!